आम्ही जाहिराती का विकतो,
शोध परिणाम का नाही.

सर्व विक्रीसाठी असल्याचे दिसत असलेल्या जगात, जाहिरातदार आमच्या शोध परिणामात अधिक चांगली स्थिती खरेदी का करू शकत नाहीत?

उत्तर सोपे आहे. आम्हाला वाटते की आपण Google वापरुन जे शोधता त्यावर आपला विश्वास असला पाहिजे. सुरुवातीपासूनच, आमचा शोधासाठीचा दृष्टिकोन आमच्या वापरकर्त्यांना सर्वात संबंधित उत्तरे आणि परिणाम प्रदान करणे हा राहिला आहे.

Google शोध परिणाम त्या वेब पृष्ठावर कोणी दुवा जोडलेला आहे तसेच ती सामग्री आपल्या शोधाशी किती संबंधित आहे हे विचारात घेतात. आमचे परिणाम ऑनलाइन समुदायास जे महत्त्वाचे आहे असे वाटते ते परावर्तित करतात, आम्हाला किंवा आमच्या भागीदारांना आपण काय पाहायला पाहिजे असे वाटते ते नाही.

आणि आम्हाला संबंधित जाहिराती प्रत्यक्ष शोध परिणामाइतक्याच उपयोगी असू शकतात असे वाटत असले तरी, जे आहे त्याबद्दल कोणीही गोंधळून जावे असे आम्ही इच्छित नाही.

Google वर प्रत्येक जाहिरात स्पष्टपणे चिन्हांकित आहे आणि प्रत्यक्ष शोध परिणामांहून वेगळी ठेवलेली आहे. जाहिरातदार जाहिरात क्षेत्रात वरती प्रदर्शित केले जाण्यासाठी अधिक अदा करू शकत असले तरी, कोणीही शोध परिणामांमध्ये स्वत: एक चांगले स्थान नियोजन खरेदी करू शकत नाही. जाहिराती आपण प्रविष्ट केलेल्या शोध संज्ञांशी संबंधित असल्या तरच फक्त दाखविल्या जातात. याचा अर्थ आपण फक्त प्रत्यक्षात उपयोगी असलेल्या जाहिराती पाहता.

काही ऑनलाइन सेवांना शोध परिणाम आणि जाहिराती दरम्यानचा फरक तितकासा महत्त्वाचा वाटत नाही.

आम्हाला वाटतो.