Google इनपुट साधने Chrome विस्तार
Google इनपुट साधने Chrome विस्तार वापरकर्त्यांना Chrome मधील कोणत्याही वेब पृष्ठांमध्ये इनपुट साधने वापरण्याची अनुमती देतो. इनपुट साधने Chrome विस्तार वापरण्यासाठी, या चरणांचे अनुसरण करा:
- Google इनपुट साधने स्थापित करा
- विस्तार चिन्ह क्लिक करा आणि “विस्तार पर्याय” निवडा
- “विस्तार पर्याय” पृष्ठामध्ये, आपण इच्छित असलेले इनपुट साधन डावीकडून उजवीकडे निवडा.
- इनपुट साधन जोडण्यासाठी डावीकडे डबल क्लिक करा. एक निवड काढण्यासाठी उजवीकडे डबल क्लिक करा.
- उजवीकडे इनपुट साधनावर क्लिक करून आणि आणि चिन्हांवर क्लिक करून निवडलेल्या इनपुट साधनांची क्रमवारी लावा.
इनपुट साधन वापरण्यासाठी, विस्तार चिन्हावर क्लिक करा. दिसत असलेल्या ड्रॉप-डाउन मेनूमध्ये, इच्छित इनपुट साधन निवडा. चालू केलेल्या इनपुट साधनासह, विस्तार बटण एक पूर्ण रंगीत चिन्ह बनते, जसे की . जेव्हा एखादे इनपुट साधन बंद असते, तेव्हा बटण राखाडी होते. “बंद करा” वर क्लिक करण्याने इनपुट साधन टॉगल करणे बंद करेल. टॉगल करणे बंद/चालू करण्यासाठी निवडलेल्या इनपुट साधनांवर आपण क्लिक देखील करू शकता.
आता आपण इनपुट साधन टॉगल करणे चालू केले आहे, एक वेब पृष्ठ उघडा, इनपुट बॉक्सवर कर्सर हलवा आणि टाइप करणे प्रारंभ करा. हे कार्य करत नसल्यास, वर क्लिक करून वेब पृष्ठ रीफ्रेश करा.
वैयक्तिक इनपुट साधने कशी वापरावी यावरील संबंधित लेख: